
सिलीगुडी (बंगाल) – वॉर्ड क्रमांक ४ मधील २ मुले चरक पूजेसाठी महानंदा नदीचे पाणी घेण्यासाठी गेले होते; परंतु नदीकाठी बसलेल्या ५ मुसलमान मुलांनी त्या २ हिंदु मुलांवर बाटल्या फेकल्या. जेव्हा दोघांनी याचा विरोध केला, तेव्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे स्थानिक आमदार शंकर घोष यांनी दिली. ही घटना १३ एप्रिलला घडली. ‘बंगालमध्ये हिंदू असणे आता पाप झाले आहे’ असे वातावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले आहे’, असे आमदार घोष यांनी सांगितले.

पीडित मुलांपैकी माणिक सरकार याने सांगितले की, बाटल्या फेकल्यानंतर काही वेळाने ते लोक धोकादायक शस्त्रे घेऊन परतले. घटनास्थळी दगड आणि काठ्या पडलेले दिसत होते. येथे अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली. विटा आणि दगड फेकण्यात आले.
चरक पूजा म्हणजे काय ?बंगाल, तसेच दक्षिण बांगलादेशामध्ये चरक पूजा चैत्र महिन्याच्या शेवटी केली जाते. या वेळी भगवान शंकर आणि कालीमाता यांची पूजा केली आहे. या पूजेनंतर बंगाली नववर्ष साजरे केले जाते. आयुष्यता समृद्धी प्राप्त व्हावी; म्हणून ही पूजा केली जाते. |
संपादकीय भूमिका
दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! |