(‘एन्.सी.ई.आर्.टी.’ म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक पुस्तकांची इंग्रजी नावे पालटून ती हिंदी केली आहेत. याला केरळचे सामान्य शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी विरोध करत ती मागे घेण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले, ‘‘ही एक गंभीर अतार्किकता आहे आणि भारताच्या भाषिक विविधतेला दुर्बल करणारे पाऊल आहे. केरळ, इतर बिगर हिंदी भाषिक राज्यांप्रमाणे, भाषिक विविधतेचे रक्षण करण्यास आणि प्रादेशिक सांस्कृतिक स्वातंत्र्याला प्राधान्य देण्यास वचनबद्ध आहे. एन्.सी.ई.आर्.टी.चा निर्णय राज्यघटनेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. पाठ्यपुस्तकांमधील शीर्षके ही केवळ नावे नसतात, तर ती मुलांच्या आकलनशक्तीला आणि कल्पनाशक्तीला आकार देतात.’
एन्.सी.ई.आर्.टी.ने पुस्तकांची पालटलेली नावे
१. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी पुस्तकांचे नाव ‘मेरीगोल्ड’ वरून ‘मृदंग’ असे पालटण्यात आले आहे. इयत्ता तिसरी पुस्तकाचे नाव ‘संतूर’ असे करण्यात आले आहे.
२. इयत्ता सहावीच्या इंग्रजी पुस्तकाचे नाव ‘हनीस्कल (HONEYSUCKLE) वरून ‘पूर्वी’ असे पालटण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय ‘हिंदी’ऐवजी विदेशी ‘इंग्रजी’ची गुलामगिरी करणारे केरळचे साम्यवादी शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवत आहेत, हे लक्षात घ्या ! |