आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतर यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट

दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले की, आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे

Sanjay Nirupam Shivsena : नागपूरमधील दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवावा !

दंगली झाल्यावरच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांची आठवण होऊन त्या पाडण्याची मागणी होऊ नये, तर प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे !

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन !

गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ३ दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मियांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.

औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नाही ! – सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन !

२१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल.

Pramod Muthalik On Love Jihad : ‘लव्ह जिहाद’शी दोन हात करण्यासाठी मुलींना त्रिशूळ दीक्षा देणार ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

‘लव्ह जिहाद’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करू ! – विहिंप आणि बजरंग दल

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे, असेच विहिंप, बजरंग दल यांच्यासमवेतच सर्वत्रच्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी संघटना अन् जनता यांना वाटते !

औरंगजेबाची कबर शासनाने लवकर काढून टाकावी, अन्यथा कारसेवा करून कबर काढू !

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत…

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदूंचा भव्य मोर्चा धडकणार !

‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’

पत्रकारांना धक्काबुक्की करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास पत्रकार आंदोलन करतील ! – उमेश तोरसकर, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकारसंघ 

दोडामार्ग तालुक्यातील ३ पत्रकारांना धक्काबुक्की करून नंतर कोंडून ठेवल्याची घटना नुकतीच घडली. पत्रकारांना अशाप्रकारची वागणूक देण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.