औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नाही ! – सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

नागपूर – औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

संघाच्या प्रतिक्रियेनंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके म्हणाले, ‘‘सुनील आंबेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी इतके आपण मोठे नाही. नागपूरची दंगल हा संपूर्ण प्रकार सुनियोजित कटाचा भाग आहे. या भूमिकेवर मी ठाम आहे.’’