Pramod Muthalik On Love Jihad : ‘लव्ह जिहाद’शी दोन हात करण्यासाठी मुलींना त्रिशूळ दीक्षा देणार ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु मुलींच्या रक्षणासाठी १०० ठिकाणी त्रिशूळ दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वक्तव्य श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले. ‘लव्ह जिहाद’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘देशात लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना आकर्षित करण्याचे विविध प्रयत्न चालू आहेत. वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १३ लाख अशी प्रकरणे नोंदवली गेली असून त्यांपैकी २ लाख ५१ सहस्र प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली अडकल्या होत्या.

श्री. मुतालिक पुढे म्हणाले की,

१. श्रीराम सेनेने ४ सहस्र ७०० महिलांना वाचवले आहे.

२. ३० मार्च आणि ६ एप्रिल या दिवशी अनुक्रमे होणारे गुढीपाडवा अन् श्रीरामरामनवमी हे उत्सव हलालमुक्त साजरे करावेत.

३. धर्मस्थल येथील सौजन्याच्या हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे.

४. राज्यातील काँग्रेस सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये अल्पसंख्यांक कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण दिले आहे, हे निषेधार्ह आहे. याच्या विरोधात श्रीराम सेनेने बेंगळुरू उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.