जागृत हिंदूंचा रेटा !

इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !

बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने विज्ञापनाद्वारे केले हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन !

धर्मांधांना त्यांच्या बिर्याणीचा प्रसार करण्यासाठी हिंदु संतांची आवश्यकता का भासली ? त्यांनी यासाठी त्यांच्या धर्मगुरूंचा वापर का केला नाही ? यावरून हॉटेलच्या मालकाची धर्मांधता दिसून येते.

विडी आस्थापनाने जाहीर क्षमायाचना न केल्यास कायदेशीर कारवाई करू !

विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी हिंदू, तसेच शीखही करत असतात.सरकार याविषयी कठोर कायदा आणून त्याची कार्यवाही करील का ?

ईशनिंदाविरोधी कायदा करा !

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे.

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !