नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची मागणी
नंदुरबार – ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतांना समितीचे प्रा. सतीश बागुल, राहुल मराठे, गौरव धामणे, भावना कदम आणि अन्य उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खंदारे यांनी जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा बनवावा. केवळ संबंधितांविरुद्धच नव्हे, तर त्याचे प्रसारण करणार्यांवरही कठोर कारवाईची तरतूद कायद्यामध्ये असावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.