‘महाराज’ चित्रपटावर बंदी घाला ! – ‘एक्स’वर होत आहे मागणी

या ट्रेंडवर एकाने लिहिले की, आधी आमिर खान याने हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा  अपप्रचार केला आणि आता त्याने तीच मशाल त्याच्या मुलाला दिली आहे; पण मदरसा आणि मशिदी यांत मौलवी करत असलेल्या गैरकृत्यांविषयी ते काहीच बोलत नाहीत.

‘महाराज’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा ! – बजरंग दलाची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी चेतावणी देण्याची वेळ का येते ? अशा चित्रपटांवर बंदी घालण्यासह त्यांची निर्मिती करणारे, त्यात अभिनय करणारे आणि असे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍यांवरही कारवाई करणे आवश्यक !

Immediate Ban On Film ‘Maharaj’ : ‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’वरील चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदू अतीसहिष्णु असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेच चित्रपट काढले जात आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करणे आवश्यक !

नाशिक येथे अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाला अटक !

हिंदु धर्मातील संतांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

(म्हणे) ‘संतांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही !’ – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्‍यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या विरोधात आक्षेपार्ह व्‍हिडिओ प्रसारित करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

देवतांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करणे टाळा. सामाजिक माध्‍यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्‍या पोस्‍ट करू नका. अन्‍यथा कठोर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबई भाजपकडून ‘माफी मागो’ आंदोलन !

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली.

वारकरी संप्रदायाकडून आज ‘ठाणे बंद’ची हाक !

वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे’’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

सुषमा अंधारे यांनी वारकर्‍यांची क्षमा मागितली !

सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण