Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या  फलकांना पोलिसांचा विरोध

हिंदु राष्ट्राचे फलक काही दिवसांपूर्वी काढतांना पोलीस प्रशासनाने समितीला पूर्वकल्पना का दिली नाही ? तसेच याचे कारणही दिले नाही. प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनात हिंदु राष्ट्रविरोधी मानसिकतेचे पोलीस असणे अपेक्षित नाही !

Satish Kumar, Gauraksha Dal : हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी !

भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.

Shri Swami Anand Swaroop Maharaj : नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध !

हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करतांना आम्ही केवळ धर्माला आधार मानले आहे. नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करण्यात आली आहे.

 Prayagraj Hindu Rashtra Convention : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयागराज येथे संत-महंतांच्या उपस्थितीत ३१ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनात हिंदु समाज, संघटना आणि संत यांना एकत्रित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध आखाड्यांतील संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, धर्मप्रेमी आणि तज्ञ व्यक्ती आपले विचार मांडतील,

Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !

सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले.

हिंदु राष्ट्रातच सर्वांची सुरक्षा आणि विकास होईल ! – स्वामी स्वरूपानंद, आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटी, आसाम

सनातन मूळ असणारे हिंदु राष्ट्र घटनात्मक रूपात निर्माण झाल्यास सर्व समाजाचा उद्धार होईल. हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर सर्वच सुरक्षित रहातील आणि सर्वांचा विकास होईल, असे मार्गदर्शक उद्गार आसाम येथील वेदप्रणा मा आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटीचे समन्वयक स्वामी स्वरूपानंद यांनी येथे केले.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या घोषणा !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भाविकांनी उत्स्फूर्तपणे ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’ असा हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.

‘Hindu Rashtra’ Hoardings Removed : हिंदु जनजागृती समितीने कुंभक्षेत्री लावलेले हिंदु राष्ट्राविषयीचे अनेक होर्डिंग्ज आणि फलक प्रशासनाने काढले !

एकीकडे शंकराचार्य, आखाडे, विविध संप्रदायांचे संत हे हिंदु राष्ट्राची उद्घोषणा करत असतांना प्रशासन मात्र फलक काढून हिंदु राष्ट्राच्या फलकांवर आक्षेप घेते, हे संतापजनक नाही का ?

Sanatan Board Demand At Mahakumbh : ‘सनातन बोर्डा’च्या मागणीसाठी कुंभक्षेत्री निदर्शने !

सनातन बोर्डाच्या मागणीसाठी २७ जानेवारीच्या सकाळी ११ वाजता सेक्टर क्रमांक १८ येथे ‘शांती सेवा शिबिरा’च्या मंडपासमोर निदर्शने करण्यात आली. सनातन हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली.