Sanatan Board Demand At Mahakumbh : ‘सनातन बोर्डा’च्या मागणीसाठी कुंभक्षेत्री निदर्शने !

सनातन हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी मोहीम !

निदर्शनांत सहभागी हिंदु धर्माभिमानी

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – सनातन बोर्डाच्या मागणीसाठी २७ जानेवारीच्या सकाळी ११ वाजता सेक्टर क्रमांक १८ येथे ‘शांती सेवा शिबिरा’च्या मंडपासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणार्‍या हिंदूंकडून एका सारणीत त्यांची संपूर्ण माहिती घेऊन स्वाक्षरी नोंदवून घेण्यात येत होती.

स्वाक्षरी अभियानात स्वाक्षरी करतांना जागृत हिंदू

या वेळी निदर्शने करणार्‍या हिंदु धर्माभिमान्यांकडून ‘बहुत सह लिया, अब नहीं सहेंगे, सनातन बोर्ड लेकर रहेंगे !’ (आतापर्यंत बरेच सहन केले; पण आता सहन करणार नाही. सनातन बोर्डाची स्थापना आम्ही करणारच !), ‘बटेंगे तो कटेंगे (विभागलो गेलो, तर मारले जाऊ !)’, ‘हिन्दू धर्म की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

स्वाक्षरी अभियानात स्वाक्षरी करतांना जागृत हिंदू

शेकडो हिंदूंनी ‘सनातन हिंदु राष्ट्रा’साठी स्वाक्षरी अभियानाच्या अर्जावर स्वाक्षरी नोंदवून हिंदु राष्ट्र आणि सनातन बोर्ड यांना पाठिंबा दर्शवला. हिंदूंना स्वाक्षरी करण्यामागील उद्देश सांगून त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात येत होत्या. या वेळी सनातन बोर्डाच्या पाठिंब्यासाठी ९९२७३ ०००३७ हा क्रमांक जाहीर करून त्यावर संपर्क (मिस्ड कॉल) करण्याचे आवाहन करण्यात येत होते.