प्रयागराज कुंभपर्व २०२५
सतीश कुमार, गौरक्षा दल

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचा मला १४-१५ वर्षांपासून परिचय आहे. मी देशवासियांना सांगू इच्छितो की, जेव्हा कुणाच्या मनातही हिंदु राष्ट्राविषयी विचार नव्हते, त्या वेळी भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.
संत-महंतही आता हिंदु राष्ट्राविषयी बोलत आहेत. गौरक्षा दलाचा हा दृढ विश्वास आहे की, हिंदु राष्ट्र झाल्यानंतर देशातील गोहत्या निश्चित थांबेल. सर्व हिंदु बांधवांना माझे आवाहन आहे की, सनातन संस्थेच्या सेक्टर ९ मधील प्रदर्शनकक्षाला अवश्य भेट द्यावी. हे प्रदर्शन पाहून एका सनातनी हिंदूने जीवन कसे जगावे ? याची माहिती सर्वांना मिळेल, असे मत गौरक्षा दलाचे श्री. सतीश कुमार यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाला त्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या समवेत भेट दिली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सनातन संस्थेच्या वतीने श्री. महेश पाठक यांनी श्री. सतीश कुमार आणि त्यांच्या सहकारी यांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’ भेट दिले.