‘Hindu Rashtra’ Hoardings Removed : हिंदु जनजागृती समितीने कुंभक्षेत्री लावलेले हिंदु राष्ट्राविषयीचे अनेक होर्डिंग्ज आणि फलक प्रशासनाने काढले !

हिंदु जनजागृती समितीने कुंभक्षेत्री लावलेले होर्डिंग्ज आणि फलक

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राविषयी जागृती होण्यासाठी फलक आणि होडिंग्ज लावले आहेत. हे फलक आणि होडिंग्ज यांवर ‘अब एक ही लक्ष्य हिंदु राष्ट्र’, ‘सभी समस्याओंका एकमात्र समाधान हिंदु राष्ट्र !’ असे लिखाण होते. त्याचप्रमाणे सेक्टर ६ येथील हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले होते.

लावलेल्या फलकांपैकी सेक्टर ९ मधून ३, सेक्टर ६ आणि ७ यांमधून काही फलक काढले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खांब आणि मोक्याच्या जागा येथे लावलेले जवळपास १५ छोटे फलकही काढण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणारे हे फलक प्रशासनाने काढल्यामुळे हिंदूंनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासनाला हिंदु राष्ट्राविषयी वावडे आहे का ? हिंदु राष्ट्राचा अर्थ प्रशासनाने विचारून घेण्याची तसदी दाखवली पाहिजे होती. एकीकडे शंकराचार्य, आखाडे, विविध संप्रदायांचे संत हे हिंदु राष्ट्राची उद्घोषणा करत असतांना प्रशासन मात्र फलक काढून हिंदु राष्ट्राच्या फलकांवर आक्षेप घेते, हे संतापजनक नाही का ?