Prayagraj Hindu Rashtra Convention : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयागराज येथे संत-महंतांच्या उपस्थितीत ३१ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र अधिवेशन !

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – हिंदु धर्म आणि समाज यांच्यासमोरील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या उद्देशाने महाकुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ३१ जानेवारी या दिवशी संत-महंतांच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अखिल भारतीय धर्मसंघ, मोरी-संगम लोअर मार्ग चौराहा, प्रयागराज येथे होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारत आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी दिली.

३१ जानेवारी  संत-महंतांच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

या अधिवेशनात बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचार, बांगलादेशी घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका, काशी, मथुरा यांसह अन्य मंदिरांच्या मुक्तीचा घटनात्मक लढा, तसेच हिंदु समाज, संघटना आणि संत यांना एकत्रित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे प्रयत्न करणे या विषयावर विविध आखाड्यांतील संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, धर्मप्रेमी आणि तज्ञ व्यक्ती आपले विचार मांडतील, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी मांडली.