राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी इयत्ता १ लीपासून ‘एन्.सी.सी.’प्रमाणे प्रशिक्षण देणार !
बालवयापासूनच शिस्त लागावी आणि त्यांच्यात देशाप्रती आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या धर्तीवर इयत्ता १ लीपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी राज्यात नवीन १० केंद्रे निर्माण केली जाणार असून २० सहस्र ३१४ विद्यार्थी यामध्ये जोडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी दादाजी भुसे यांची अधिकार्यांसमवेत बैठक झाली.