
रत्नागिरी – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थानाच्या सुशोभिकरणाचे भूमीपूजन १४ एप्रिल या दिवशी राज्याचे उद्योगमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. रत्नागिरी नगर परिषदेच्या योजनेतंर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी शासनाकडून ४.५ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.
या वेळी कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
माझ्या मतदारसंघातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणाच्या ४ कोटीच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी दिपक पटवर्धन, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, तालुकाप्रमुख महेश म्हाप,अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. pic.twitter.com/4bcPITDuON
— Uday Samant (@samant_uday) April 14, 2023
या वेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,
१. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्यवीर आपली शक्तीस्थाने आहेत.
२. एक ऑगस्ट या दिवशी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी केलेल्या घोषणेनुसार सदर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुशोभिकरणाचे पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
३. सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान प्रतिदिन सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील, याविषयी आदेश काढण्याकरता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील