पाकिस्तानमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ६ सैन्याधिकारी ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा !

बलुचिस्तान (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमध्ये पाकच्या सैन्याचे एक हेलिकॉप्टर कोसळून ६ सैन्याधिकार्‍यांचा मृत्यू झाला. यात २ मेजर आणि ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या ३ कमांडोंचा समावेश आहे.

बलुचिस्तानातील हरनाई भागात हा अपघात झाला आहे. पाकिस्तान सैन्याने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नसले, तरी ‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.