मौलाना साजिद रशिदी (म्हणे) ‘जेवढे बोलले जाते तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मोठे नाही !’

अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे संतापजनक विधान !

मौलाना साजिद रशिदी

नवी देहली – छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या अनेक राजांना मारले होते, तसेच त्यांच्या राज्यांवर नियंत्रण मिळवले होते. (स्वराज्यद्रोह्यांना महाराजांनी धडा शिकवला होता. त्या घटनांचा राशिदी सोयीस्कर वापर करत आहेत ! – संपादक) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी जेवढे बोलले जाते तेवढे कुठलेही मोठे यश त्यांनी मिळवलेले नाही, असे संतापजनक विधान अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.

मौलाना साजिद रशिदी यांनी मेवाडचे राजे महाराणा सांगा यांच्याविषयीही संतापजनक विधान केले आहे. त्यांनी दावा केला की, मोगल बादशाह बाबर याला महाराणा सांगा याने भारतात आणले होते. महाराणा सांगा याने अनेक अनेक राजपूत राजांना ठार मारले होते.

(म्हणे) ‘महाराणा सांगा याने बाबरला भारतात आणले !’ – समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन

सुमन यांनी केला खोटा दावा

मौलाना रशिदी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनीही महाराणा सांगा यांच्याविषयी राज्यसभेत असेच विधान केले होते. ते म्हणाले होते की, भाजपचे लोक ‘मुसलमानांमध्ये बाबरचा डीएन्ए (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.) आहे’, असे म्हणत असतात; मात्र या बाबरला भारतात कुणी आले होते ?, हे जाणून घेण्यास मी इच्छुक आहे. देहलीत सत्तेवर असणार्‍या इब्राहिम लोधी याला पराभूत करण्यासाठी बाबराला राणा सांगा याने आणले होते. (अब्दाली याला भारतात कुणी बोलावले, हे सुमन यांनी का सांगितले नाही ? – संपादक) मुसलमान जर बाबरचे वंशज असतील, तर तुम्ही त्या गद्दार राणा सांगाचे वंशज आहात.’ खासदार सुमन यांचा दावा अनेक इतिहासतज्ञांनी खोडून काढला आहे. सुमन यांनी केलेला दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मुसलमान आक्रमकांना धडा शिकवला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यामुळेच भारतात इस्लाम फोफावला नाही. यामुळे आजही धर्मांध मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करतात. रशिदी यांनी केलेले वक्तव्य हे त्याचेच उदाहरण होय !
  • यातून राशिदी यांनी जाणीवपूर्वक असे विधान केले आहे, हे स्पष्ट असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !