Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

उत्तराखंडमध्ये ईदच्या दिवशी १७ ठिकाणांची नावे सरकारने पालटली

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधमसिंह नगर या ४ जिल्ह्यांतील १४ ठिकाणांची नावे पालटली आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी ईदच्या दिवशीच या जिल्ह्यांतील अनेक ठिकाणांची नावे पालटली आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे की, ही नामांतरे सार्वजनिक भावना आणि भारतीय संस्कृती अन् वारसा यांच्या आधारे केली जात आहेत. याद्वारे लोक भारतीय संस्कृती आणि तिचे जतन यांसाठी योगदान देणार्‍या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊ शकतात.

यासह नैनिताल जिल्ह्यातील ‘नवाबी रोड’चे ‘अटल मार्ग’ असे नामकरण करण्यात आले, तर उधम सिंह नगरमधील सुलतानपूर पट्टी नगर परिषदेचे नाव कौशल्या पुरी असे ठेवण्यात येणार आहे. हरिद्वारमधील सलेमपूरचेही ‘शूरसेन नगर’ असे नामकरण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

उत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ?