MNS On Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगर येथे लावण्यात आले ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा लिखाणाचे फलक !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी दिले होते निर्देश !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात केलेल्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी लावलेले फलक !

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे केवळ कबर दिसली पाहिजे, तिथे एक मोठा फलक लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, हा आमचा इतिहास. आम्ही कुणाला गाडले, हे जगाला कळू द्या, तसेच तिकडे लहान मुलांच्या सहली गेल्या पाहिजेत, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात केले होते. त्यानुसार २ एप्रिलला मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, असे फलक लावले आहेत.

मनसेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून यात खालील ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत –

१. औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल, तर ती त्वरित काढली जावी.
२. यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही.
३. सर्व शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश देण्यात यावा.
४. तिथे ‘आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा आशयाचा फलक लावण्यात यावा.
५. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.

(या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे. – संपादक)

पहा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित मेळाव्यात केलेले वक्तव्य –