RSS Dattatreya Hosabale On Aurangzeb : ‘गंगा-जमुनी तहजीब’विषयी बोलणार्‍यांनी औरंगजेबाला नायक बनवले !

रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची स्पष्टोक्ती !

(गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदु अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव आणला जातो.)

रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘गंगा-जमुनी तहजीब’विषयी बोलणार्‍यांनी औरंगजेबाला नायक बनवले आहे आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यासंदर्भात ते काहीही बोलत नाहीत. देहलीतील ‘औरंगजेब मार्गा’चे नाव पालटून एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले. आपल्याला बाहेरून येणार्‍या एखाद्याला आदर्श बनवायचे आहे कि येथील लोकांचा आदर करायचा आहे ? हे सूत्र आहे. स्थानिक आक्रमकांसमवेत रहाण्याच्या मानसिकतेविषयी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे, अशी स्पष्टोक्ती रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

होसबाळे पुढे म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भूतकाळात इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. आता हिंदु समाज आत्मविश्‍वासाने उदयास येत आहे.

आरक्षणावर होसबाळे पुढे म्हणाले की, सर्व राज्य सरकारे जातीवर आधारित आरक्षण देतात; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मावर आधारित आरक्षणाच्या बाजूने नव्हते.