हिंदू संघटनासाठी आवश्यक ‘स्वयंबोध’ आणि ‘शत्रूबोध’ !

१. स्वत:ची ओळख विसरलेला हिंदु समाज !

‘जेव्हा आपण स्वयंबोधावर बोलतो, तेव्हा फार विचित्र वाटते. तो समाज कसा असेल, जो स्वतःलाच ओळखत नाही. एक वेळ शत्रूला ओळखत नाही, हे समजू शकतो; पण स्वतःलाच न ओळखणे, हे कसे शक्य आहे ? आपण अशा परंपरेतून येतो, जेथे सत्यवादी राजा हरिश्चंद्र होऊन गेला. त्याने  सर्वस्वाचा त्याग केला; पण सत्याची कास सोडली नाही. आपण अशा परंपरेतून आलो आहोत, जेथे युधिष्ठिराने अर्धसत्य बोलल्यामुळे त्याची कीर्ती खाली घसरते. श्रीकृष्णाला आपण ईश्वर मानतो आणि त्याने भीमाला दुर्योधनाची मांडी फोडण्याची खूण केली. त्या वेळी त्याने कपट का केले ? अशी शेकडो उदाहरणे आहेत. आपण अशा परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्याला सर्वतोपरी समजले जाते आणि खोटे बोलणार्‍याकडे हीन दृष्टीने पाहिले जाते.

२. जिहाद म्हणजे काय ?

‘जिहाद’ शब्दाची विविध प्रकारे व्याख्या केली जाते; परंतु आपल्याला जिहादपेक्षाही महत्त्वाचे शब्द सापडतील. आतापर्यंत आपण केवळ एकाच शत्रूविषयी (जिहादविषयी) बोलत होतो. त्याच्याशी आता ‘ख्रिश्चॅनिटी’, माओवाद, ‘वोकिइझम्’ यांनाही जोडले पाहिजे. हे सर्व आपले शत्रू आहेत. ते जागतिक साम्राज्याचे प्रतिनिधीत्व करत असून जागतिक स्तरावर त्यांचा खेळ खेळत आहेत. आपण केवळ एका ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघर्ष करत आहोत, तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की, आपण कोणता धोका पत्करत आहोत.

‘जिहाद’चा शाब्दिक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक शब्दाचे विविध अर्थ होऊ शकतात. एक त्याचा शब्दशः अर्थ होतो आणि दुसरा त्याचा भावार्थ होतो. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या लोकांसमवेत एखादी मुसलमान व्यक्ती असते. लोकांना संबोधन करतांना म्हणते, ‘मुसलमान आणि इस्लाम यांना चुकीचे समजले जात आहे.’ काहींना वाटते, ‘हे धर्म आणि अधर्म यांचे युद्ध आहे.’ अनेक जण बर्‍याच गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. पैंगबर यांना अरबमधील एका व्यक्तीने, ‘खरा मुजाहिद कोण ?’, असा प्रश्न विचारला. (मुजाहिद म्हणजे जिहाद करणारा.) त्यावर पैंगबर म्हणाले, ‘जो स्वतःमधील वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढतो, तो खरा मुजाहिद आणि तोच खरा जिहाद करणारा.’ पैंगबर म्हणतात, ‘परस्त्रीकडे टाकलेली पहिली दृष्टी ही सामान्य आहे आणि दुसरी दृष्टी ही सैतानाची आहे. त्या सैतानी दृष्टीपासून आणि वाईट प्रवृत्तीपासून आपण वाचले पाहिजे.’

 

आपण हिंदू आपल्या धर्मासाठी लढण्याची इच्छाशक्तीच गमावून बसलो आहोत.  ‘मला एका बहुराष्ट्रीय आस्थापनात नोकरी मिळावी’, ‘माझा एक मोठा बंगला असावा’, ‘मला एक चारचाकी गाडी हवी’, तसेच ‘मला एवढे वेतन हवे की, मी प्रत्येक वर्षी एक युरोपची यात्रा करू शकेन’, अशा प्रकारच्या आपल्या महत्त्वाकांक्षा असतात. अशा व्यक्तीला जिहादशी लढण्याची आवश्यकता आहे, असे सांंंंगितले, तर ती त्यापासून सुटका करण्यासाठी काहीतरी पळवाट काढते आणि खोटी कारणे सांगते.


श्री.नीरज अत्री यांचा परिचय

श्री. नीरज अत्री

श्री. नीरज अत्री हे पंचकुला (हरियाणा) येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष आहेत. या अंतर्गत ते स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करतात. सध्या इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण होत आहे. ते रोखण्यासाठी इतिहासाचा शोध घेऊन ते ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कंपॅरिटिव्ह स्टडीज’च्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. यासमवेतच त्यांनी ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’ हे पुस्तक लिहिले आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून विकृत इतिहास कशा प्रकारे पसरवला जातो, ते उघड केले आहे. वर्ष २०१७ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करण्यात आली आहे.

३. ‘काफीर’ म्हणजे काय ?

‘काफीर’ या शब्दाचा लोकांच्या डोक्यामध्ये सतत मारा केला जातो. मुसलमान इतरांना काफीर म्हणतात; पण मुळात त्यांनाच काफीर म्हणजे काय ?, हे समजलेले नाही. ‘आम्ही सांगत असलेली विचारसरणी तुम्हाला मान्य नाही, म्हणजे तुम्ही काफीर’, असे त्यांचे मत आहे. १४०० वर्षांपूर्वी अरबस्तानातील काबामध्ये तेथील स्थानिक देवीदेवता होत्या. पैंगबर यांनी त्यांना मानण्यास नकार दिला. त्यांनी ‘मी मूर्तीपूजा करणार नाही’, असे सांगितले. त्या वेळी पैंगबर यांनाही ‘काफीर’ संबोधण्यात आले होते. अरबमध्ये त्यांची विचारसरणी न मानणार्‍याला ‘काफीर’ म्हटले जाते.

त्यामुळे आता आपण जे भारतीय या देशाची राज्यघटना मानत नाहीत, त्यांनाच ‘काफिर’ म्हणू शकतो. जे राज्यघटनेला मानतात, ते ‘बिलिव्हर’ आहेत. अशा प्रकारे त्याचे भाषांतर किंवा व्याख्या दिली आहे. सर्वसाधारणपणे सामान्य हिंदूंना या शब्दांचा अर्थ माहिती नसतो.

४. अहल-ए-किताब

जिहाद आणि काफिर या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे असतील, तर सर्वांत अधिकृत स्रोत कुराण आहे. कुराणमध्ये प्रकरण क्र. ९८, सुरा ९८ च्या पहिली आणि ६ वी आयत आपल्याला काफिरचा अर्थ स्पष्ट करून देते. त्यांनी ‘अहल-ए-किताब’ आणि ‘मुशरिक’ या दोन शब्दांचा वापर केला आहे. ज्यांच्याकडे पुस्तक (किताब) आहे, अशा लोकांना ‘अहल-ए-किताब’ म्हटले जाते. इंग्रजीत ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे, त्यांना ‘पीपल ऑफ द बुक’, असे म्हणतात. कुराणच्या प्रकरण क्रमांक ९८ मध्ये आयत क्रमांक ६ चा अर्थ आहे की, जे लोक काफिर आहेत, म्हणजे अहल-ए-किताब आणि मुशरिक आहेत. यात शंका घेण्याला वाव नाही. ज्यांच्याकडे एक पुस्तक आहे, (इस्लामनुसार) ते लोक अर्थात ज्यू आणि ख्रिस्ती आहेत. त्यामुळे ते ‘अहल-ए-किताब’ झाले.

५. मुशरिक

आपल्याला इस्लामची शब्दावली समजण्यासाठी अरबी शब्दावली समजणे आवश्यक आहे. आपल्या देशात लक्षपूर्वक बातम्या पाहिल्या, तर त्यांचे सावकाशपणे उर्दूकरण किंवा अरबीकरण होत असल्याचे आपल्या लक्षात येते. अशा कार्यक्रमात सहभागी होणार्‍याला ‘मुशरिक’ म्हटले जाते. (मक्का येथील बहुदेववादी यांनी इस्लामचा विरोध केला, त्यांना प्रारंभी ‘मुशरिक’ म्हटले जात होते. मूर्तीपूजकही म्हटले जाते.)

इस्लामवाद्यांचे म्हणणे आहे की, सर्वांनी केवळ अल्लालाच मानले पाहिजे, तसेच सर्वजण केवळ अल्लालाच प्रार्थना करू शकतात. दुसर्‍या कुणालाही प्रार्थना करायची नाही. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’, अशी प्रार्थना केली, तर ईश्वराला अल्लासह सहभागी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला मुशरिक समजले जाते आणि शिर्क करणे, हा इस्लाममध्ये सर्वांत मोठा गुन्हा आहे. याचा अर्थ ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’, असे म्हणणे, हा सर्वांत मोठा गुन्हा आहे. त्यांचा ‘अल्ला’ तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. त्यांच्या मते जे लोक काफिर, अहल-ए-किताब आणि मुशरिक आहेत, ते नरकाच्या आगीत पडतील.

या अल्ला नावाच्या देवाने जे काही निर्माण केले, त्यात सर्वांत वाईट ‘अहल-ए-किताब’ आणि ‘मुशरिक’ हे आहे. याहून अधिक चांगली व्याख्या आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. ही व्याख्या सर्वश्रेष्ठ ‘ॲथॉरिटी’कडून येते. ज्या कुणी संस्था आणि संघटना मुसलमान अन् मौलवी यांना त्यांचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात, तर आपण लक्षात घेतले पाहिजे की, ही काफिरची व्याख्या आहे. याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच व्याख्या होऊ शकत नाही. कोणताही मौलाना, मौलवी, मुफ्ती, झाकिर नाईक याहून वेगळी व्याख्या करू शकत नाही. जर तो तसे करत असेल, तर तो चक्क खोटे बोलत आहे, असे समजावे.

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– श्री. नीरज अत्री, हिंदु विचारवंत आणि अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905027.html