संपादकीय : औरंग्याच्या पिलावळीची वळवळ रोखा !

‘जगातील अनेक देशांना केवळ भूगोल आहे, तर भारताला इतिहास आहे’, असे म्हटले जाते. अनेक देशांचा इतिहास काही शतकांचा आहे, तर भारताचा इतिहास अनेक युगांचा राहिलेला आहे. भारताच्या या इतिहासामध्ये शौर्य आहे, तसेच दौर्बल्यही आहे. स्वातंत्र्य आहे, तसेच पारतंत्र्यही आहे. समृद्धता आहे, तशी अत्यंत दारिद्र्यताही आहे. धार्मिकता आहे, तशी धर्मांधता आहे. या सर्वांचा संघर्ष नेहमीच चालू असलेलाही दिसून आलेला आहे. इतिहासातून शिकायचे असते आणि नवा इतिहास घडवायचा असतो. असे इतिहास शिकणारे आणि घडवणारे भारतात जन्माला येऊन गेले आहेत अन् पुढेही जन्माला येत रहाणार आहेत. इतिहास प्रत्येकाची नोंद ठेवत असतो. तो पालटता येत नाही; मात्र लपवता येऊ शकतो. भारतात गेली अनेक दशके इतिहास लपवण्याचाच प्रयत्न चालू आहे. कारण सत्ता ! सत्तेसाठी प्रत्येक शासनकर्ता इतिहास लपवत राहिला आहे. इतिहास लपवणे केवळ भारतात घडते, असे नाही, तर विदेशातही घडते. सोयीचा इतिहास सांगणे आणि अडचणींचा इतिहास लपवणे, असे शासनकर्ते करत असतात. सध्या देशात ‘छावा’ चित्रपटाने हिंदूंचे डोळे उघडले आहेत. आतापर्यंत देशातील जनतेपासून (महाराष्ट्रापासून नव्हे) लपवून ठेवलेला इतिहास यातून शक्य तितका दाखवण्यात आला आहे. काही भाग गाळण्यात आला आहे किंवा तो पहाणे, सांगणे, दाखवणे शक्य होणार नाही, यामुळेच टाळण्यात आला आहे; मात्र जो काही दाखवण्यात आला आहे, त्यामुळेच देशात हिंदूंमध्ये क्षात्रतेजाची थोडीशी तरी जागृती झाली आहे. हे औरंग्याच्या पिलावळीच्या डोळ्यांत खुपू लागल्याने त्यांनी औरंग्याचा उदोउदो करण्याचा आटापिटा चालू केला आहे. समाजवादी (कि नमाजवादी) पक्षाचे आमदार अबू आझमी, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद, काँग्रेसचे नेते राशिद अल्वी, उदीत राज, दानिश अली आदींनी औरंग्या त्यांचा पूर्वज असल्यानुसार औरंग्याचे समर्थन केले. याची त्यांना कोणतीही खंत नाही, तर अभिमान असल्याचीच भावना आहे. राजकीय स्वार्थासाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणारे पक्ष यांच्यासाठी ‘छावा’ चित्रपट मोठी संधी असल्याने ते त्याच दृष्टीने औरंग्याचे समर्थन करत आहेत. काँग्रेस स्वतःला अहिंसावादी, गांधीवादी विचारांनुसार वागणारी म्हणत असली, तरी काँग्रेसचा मोहनदास गांधी यांच्या उदयापासून हिंसाचार्‍यांचे, मोगलांचे, धर्मांध मुसलमानांचे समर्थन करणे, त्यांना पाठीशी घालणे, असाच इतिहास आतापर्यंतचा राहिलेला आहे. केरळमध्ये वर्ष १९२० मध्ये मोपल्यांनी (मुसलमानांनी) हिंदूंच्या विरोधात केलेल्या हिंसाचाराचा मोहनदास गांधी यांनी विरोध केला नव्हता. धर्मांतर झालेल्या हिंदूंना परत धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण मोहीम चालवणारे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणार्‍या रशिद या धर्मांध मुसलमानाला मोहनदास गांधी यांनी ‘भाऊ’ म्हणत त्याचा बचाव केला होता. फाळणीच्या वेळी लाखो हिंदूंची हत्या करण्यात आल्यावरही गांधी यांनी हिंदूंसाठी एक शब्दही सहानुभूतीचा काढला नव्हता, उलट प्रत्युत्तर देणार्‍या हिंदूंना रोखण्यासाठी उपोषण चालू केले. याच विचारांतून काँग्रेस आणि तिचे नेते आजही वागत आहेत. काँग्रेस मोगलांची वंशज असल्याप्रमाणेच औरंग्याच्या बाजूने बोलत असते. याच काँग्रेसने भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय हिंदूंना त्यांच्यावर मोगलांनी केलेला अत्याचार शाळांतून शिकवला नाही, तर ‘मोगल कसे चांगले होते’, हे शिकवले. जे आजही शिकवले जात आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ भाजपचे सरकार असतांनाही अद्याप शाळांतील हा शिकवण्यात येणारा इतिहास पालटलेला नाही. काही ठिकाणी थोडासा पालट झाला आहे; मात्र मूळ हाच भाग अद्यापही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचाच नव्हे, तर अन्यही हिंदू राजांचा इतिहास शिकवण्यात येऊ शकला असता; मात्र तशी वस्तूस्थिती नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

कायदा करून कारवाई करा !

औरंगजेब असो किंवा अन्य कोणताही मोगल असो, त्याचे उदात्तीकरण करणे या देशात गुन्हा असला पाहिजे. तसा कायदा करणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे. कायद्यानुसार शिक्षा होऊ लागल्यास यावर प्रतिबंध येऊ शकतो. यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी हिंदूंनी अन् त्यांच्या संघटनांनी सरकारवर दबाव निर्माण करायला हवा. प्रत्येक वेळा कुणी ना कुणी मोगलांचे उदात्तीकरण करील आणि मग हिंदूंमध्ये असंतोष निर्माण होईल अन् त्यानंतर काहीतरी कारवाई केली जाईल, हे चक्र थांबले पाहिजे. केवळ मोगलच नव्हे, तर जेव्हापासून भारतावर मुसलमानांचे आक्रमण झाले, तेव्हापासूनच्या आक्रमणकर्त्यांच्या संदर्भात ते असले पाहिजे. बिन कासिमपासून टिपू सुलतानपर्यंत यात नावे असली पाहिजेत. कायद्यांद्वारे त्यांचे समर्थन करणार्‍यांची नांगी ठेचता येईल. त्याच वेळेस केंद्रीय शिक्षण संस्था आणि प्रत्येक राज्यांच्या शिक्षण संस्थांच्या पाठ्यपुस्तकांतून केवळ अन् केवळ हिंदूंच्या शौर्याचा इतिहास, तसेच त्यांच्यावर आक्रमणकर्त्यांनी कसा अत्याचार केला, हे शिकवले पाहिजे. जेव्हा असे होईल, तेव्हा कुणी खोटा इतिहास सांगून देशाची दिशाभूल करू शकणार नाही. या आक्रमणकर्त्यांना पाठीशी घालण्याचे काम ज्या लोकांनी केले, त्यांची माहितीही यात दिली पाहिजे. मोहनदास गांधी, जवाहरलाल नेहरू पासून ते अबू आझमीपर्यंतच्या लोकांची नावे यात असली पाहिजेत. यातून जनतेला लक्षात येईल की, घरभेदी कोण होते ?

हिंदु वीरांवर चित्रपट बनवण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे !

‘तान्हाजी’, ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरळ स्टोरी’, ‘छावा’ या चित्रपटांतून जो इतिहास दाखवण्यात आला, तो पाहून हिंदूंमध्ये जागृती झाली. चित्रपट हे माध्यम इतिहास सांगण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात येते. विदेशात अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले आहेत. हिटलरने ज्यूंचा कसा छळ केला, यावर अनेक चित्रपट आहेत. ‘शिंडलर्स लिस्ट’ यावर प्रसिद्ध चित्रपट आहे. भारतात अशा अनेक ऐतिहासिक घटना आहेत, ज्यांच्या माध्यमांतून लपवलेला इतिहास सांगण्यासह लोकांना इतिहास घडवण्यासाठी प्रेरित करता येऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन इतके मोठे आहे की, अनेक घटनांवर स्वतंत्र चित्रपट बनवता येऊ शकतात. ॲलेक्झांडर आणि पुरु यांच्यावरही चित्रपट झाला पाहिजे. मराठे आणि पेशवे यांच्या शौर्यावर कितीतरी चित्रपट काढता येऊ शकतात. असे चित्रपट बनवण्यासाठी केंद्र सरकारनेच प्रोत्साहन दिले पाहिजे. याचा लाभ केवळ भारतियांनाच नाही, तर जगाला इतिहास समजण्यासाठी होईल. नेपोलियन महान वीर होता, हे जगाला सांगितले जाते; मात्र त्याच्यापेक्षा वीर राजे, उदा. विक्रमादित्य आदी भारतात होऊन गेले, हे चित्रपटांतून समोर आले पाहिजे.

मुसलमान आक्रमणकर्त्यांचा उदोउदो करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी कायदा करा !