MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

खासदार उदयनराजे भोसले

सातारा – औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणार्‍या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणार्‍या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण चालू आहे. त्याचे इथे उरूस (एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव) भरवले जात आहेत, हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे, असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

ते म्हणाले की,…

१. औरंगजेबाने या देशातील प्रत्येक राजवटींना त्रास दिला, रयतेवर अत्याचार केले. धर्मांतर घडवले. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून सख्ख्या भावांची हत्या केली, वडिलांना बंदीवासात टाकले. येथील मंदिरे आणि देव यांच्यावर त्याने आक्रमण केले. आमची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो आणि त्याचे पूर्वज हे केवळ आमचा देश लुटण्यासाठी आले होते. त्यांनी येथील देव, देश आणि धर्म बुडवण्याचे काम केले. असा माणूस आमच्यासाठी आदर्श कसा होऊ शकतो ?

२. औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे.

३. औरंगजेबाचा गौरव करणार्‍या पिलावळीने हे प्रकार थांबवावेत, अन्यथा त्यांनी औरंगजेबाच्या मूळ देशात चालते व्हावे.

 संपादकीय भूमिका 

औरंगजेबप्रेमींनी त्याच्या मूळ देशात चालते व्हावे !