हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस याची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ !

तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान करणे हा राष्ट्रद्रोहच ! यालाही आता काही अतीशहाणे बुद्धीवादी ‘विचार स्वातंत्र्य’ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ वगैरे गोंडस नावाने पाठीशी घालतील ! यातून भारतात बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूच अधिक, हे सिद्ध होते !

भारतमाता आणि हिंदु देवता यांची विकृत चित्रे काढणार्‍या म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात ठेवू नयेत !

हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अनावरणानंतर काही घंट्यांतच तोडफोड

रॉविल येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर काही घंट्यांनतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?

दिवाळीला जाणीवपूर्वक ‘रेडिओ मिर्ची’च्या सूत्रसंचालिका सायमा यांच्याकडून हिंदूंच्या सणांचा अवमान !

हिंदू सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि त्यांच्या सणांची टवाळी करतो. अशी टवाळी करण्याचे धारिष्ट्य अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या वेळी का दाखवले जात नाही ?

कापराच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन : भाविकांमध्ये तीव्र अप्रसन्नता !

कापूर बनवणार्‍या एका आस्थापनाने विविध प्रसारमाध्यमांतून (दूरदर्शन, वेबसाईट, यू ट्यूब) स्वत:च्या कापूर उत्पादनाच्या विज्ञापनासाठी प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेल्या कलाकाराचा वापर केला आहे. वेश श्रीरामाचा आणि वर्तन सामान्य युवकासारखे दाखवून विनोद निर्माण करून श्री रामभक्तांच्या भावनांची थट्टा केली आहे.

ऐतिहासिक ‘विनोद’ नकोत !

लोकहो, ऐतिहासिक मालिका केवळ पाहून सोडून देऊ नका किंवा त्यांतील पात्रांची टर उडवू नका. त्या व्यक्तीरेखांमुळे भारताचा गौरवशाली इतिहास घडला आहे, हे विसरू नका.

शरजील उस्मानी याला जामीन मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे साहाय्य ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा

शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले.