दिवाळीला जाणीवपूर्वक कांदे, बटाटे, मिरची, लसूण आणि आले यांचे छायाचित्र प्रसारित करून ‘रेडिओ मिर्ची’च्या सूत्रसंचालिका सायमा यांच्याकडून हिंदूंच्या सणांचा अवमान !
|
हिंदू सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि त्यांच्या सणांची टवाळी करतो. अशी टवाळी करण्याचे धारिष्ट्य अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या वेळी का दाखवले जात नाही ? – संपादक
नवी देहली – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘रेडिओ मिर्ची’ची सूत्रसंचालिका आर्.जे. सायमा यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावर कांदे, बटाटे, मिरची, लसूण आणि आले यांचे छायाचित्र प्रसारित करून हिंदूंच्या सणांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
Diwali gift😛 pic.twitter.com/q7tphhbHsY
— Sayema (@_sayema) October 30, 2021
याच सायमा यांनी ईदच्या वेळी मात्र आवर्जून स्वतः नवा पोशाख परिधान करून स्वतःचे आणि स्वादिष्ट पक्वान्न यांचे छायाचित्र प्रसारित केले होते.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)