हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

केरळ पोलिसांवर तत्परतेने कारवाई न केल्याचा राष्ट्राभिमान्यांचा आरोप !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या राष्ट्र भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

थिरूवनंतपूरम् – येथील कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. या विरोधात स्थानिक राष्ट्राभिमान्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी त्वरित कारवाई न करता अनेक घंटे उशीर केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. या घटनेचा केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

स्थानिक समाजसेवक असलेल्या राजू नावाच्या तक्रारदाराने केरळ पोलिसांच्या विरोधात आरोप करत म्हटले, ‘मी या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोलिसांना पाठवले होते. काही पोलीस अधिकार्‍यांनी ही माहिती संबंधित हॉटेल मालकापर्यंत पोचवली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी यायच्या आतच तेथून राष्ट्रध्वज काढून घेण्यात आला.’