गांधी यांनी हे राम म्हटलेच नव्हते, असे मी कधीच सांगितले नाही ! – वेंकिटा कल्याणम् यांची कोलांटीउडी

मोहनदास गांधी यांनी हे राम म्हटलेच नव्हते, असे मी कधीच सांगितले नाही, अशी माहिती गांधी यांचे खासगी सचिव वेंकिटा कल्याणम् (९६ वर्षे) यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

(म्हणे) गांधी हत्येच्या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली सुटका ही सबळ पुराव्याअभावी !

ज्याप्रमाणे टूजी घोटाळ्यात सबळपुराव्यांअभावी राजा यांची सुटका झाली, त्याचप्रमाणे गांधी हत्या प्रकरणात केवळ पुराव्याअभावी सावरकर यांची सुटका करण्यात आली. वास्तव मात्र वेगळेच होते, अशी मुक्ताफळे तुषार गांधी यांनी उधळली.

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांनाच झाला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांना झाला; मात्र त्यांच्यावर संशय घेण्याचे टाळण्यात आले, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी येथे केले. हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि शंकराचार्य

गांधीहत्येची पुन्हा चौकशी करून भाजप आणि संघ हिंदू महासभेचे श्रेय हिरावून घेऊ शकत नाही ! – हिंदू महासभा

गांधीहत्येचे श्रेय भाजप आणि संघ आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. उलट त्यांनी आमचे आभार मानायला हवेत. चौथ्या गोळीचे सूत्र मांडून दोन्ही संघटना संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत.

गांधीहत्या प्रकरणाचा पुनर्अन्वेषण करण्यासाठी निष्पक्ष सल्लागार म्हणून अमरिंदर शरण यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाकडून मोहनदास गांधी यांच्या हत्येचे पुनर्अन्वेषण करणे आवश्यक आहे काय, हे पहाण्यासाठी निष्पक्ष सल्लागार म्हणून ज्येष्ठ अधिवक्ता अमरिंदर शरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोहनदास गांधी यांच्या हत्येच्या घटनेचा तिसरा टेलिग्राम उघड करण्यात यावा !

मोहनदास गांधी यांची हत्या झाल्याच्या ३० जानेवारी १९४८ या दिवशी अमेरिकन दूतावासातील राजदूत हर्बट टॉम रेनर यांनी नथुराम गोडसे यांना पकडले होते. रेनर यांनी त्या घटनेविषयी ३ टेलिग्राम तत्कालीन अमेरिकन सरकारला पाठवले होते.