कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केल्याचा आरोप

कुडाळ – स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

(सौजन्य :ABP NEWS)

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीत बोलतांना पद्मश्री राणावत म्हणाल्या होत्या की, ‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये मिळाले आहे.’

‘देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती जणांनी बलीदान दिले हे राणावत यांना ठाऊक आहे का ? तेव्हा तिचा जन्म तरी झाला होता का ? असे संतप्त प्रश्‍न उपस्थित करत ‘स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करणार्‍या राणावत हिचा ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घ्यावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एकातरी काँग्रेसवाल्याने बलीदान दिले का ? ज्यांनी बलीदान दिले, त्या जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ? – संपादक)