Periya Double Murder Case : माकपच्या माजी आमदारासह ४ जणांना ५ वर्षे सश्रम कारावास, तर १० जणांना जन्मठेपेची शिक्षा

केरळमध्ये काँग्रेसच्या २ नेत्यांच्या हत्येचे प्रकरण

हत्या करण्यात आलेले काँग्रेसचे नेते

कोची (केरळ) – काँग्रेसच्या २ नेत्यांच्या हत्येच्या प्रकरणी कोचीच्या सीबीआय न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार के.व्ही. कुन्हीरामन् आणि अन्य ३ जण यांना ५ वर्षे सश्रम कारावास अन् १० कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील पेरिया येथे काँग्रेसचे नेते कृपेश आणि सरतलाल यांची हत्या करण्यात आली होती. के.व्ही. कुन्हीरामन् यांनी मारेकर्‍यांना साहाय्य केले होते. या प्रकरणाशी संबंधित २४ आरोपींपैकी १४ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते, तर १० जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यापूर्वी केरळ पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत होते; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. (सीबीआयने अन्वेषण केल्यामुळेच सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आणि त्यांना शिक्षा होऊ शकली. केरळ पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला असता, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदु संघटनांच्या कार्येकर्त्यांवर खोटे आरोप झाल्यावर त्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे आता माकपवर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत ? राजकीय पक्ष, तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी आता गप्प का आहेत ?