Kerala SC Upholds Life Imprisonment : माकपच्या ५ कार्यकर्त्यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली

केरळमध्ये संघाच्या २ स्वयंसेवकांच्या हत्येचे प्रकरण

सर्वाेच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील थलासेरी येथे वर्ष २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ स्वयंसेवकांच्या हत्येच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ५ कार्यकर्त्यांना कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा आधी केरळ उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात काही परस्परविरोधी घटक आहेत, या आधारावर हत्येची संपूर्ण घटना खोटी मानता येणार नाही.

केरळमधील कन्नूरमध्ये २ मार्च २००२ या दिवशी स्वयंसेवक सुजीस आणि सुनील यांची हत्या करण्यात आली होती. ते झोपेत असतांना माकपच्या कार्यकर्त्यांनी कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या केली. यानंतर त्यांचा मृतदेह पाणथळ शेतात फेकून देण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारांचा भरणा असणारा माकप ! हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना न्यायालयाकडून शिक्षा होत असल्याने आता या पक्षावर बंदी घालण्याची मागणी देशपातळीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी करणे आवश्यक आहे !