Kerala ED : अंमलबजावणी संचालनालयाकडून माकपची केरळमधील पक्षाची भूमी आणि ७५ लाख रुपयांची बँक खाती जप्त !

कोची (केरळ) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील करुवन्नूर सेवा सहकारी बँक घोटाळा प्रकरणाशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकपची) भूमी आणि ७३ लाख रुपयांची बँक खाती जप्त केली. यासह विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या एकूण २८ कोटी ६५ लाख रुपये मूल्यांची मालमत्ताही जप्त केली आहे.

माकपला हे पैसे लाभार्थ्यांकडून निधीच्या स्वरूपात मिळाल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. माकपने हे आरोप फेटाळले आहेत. ‘ईडी’ने बँक घोटाळ्याशी आमच्या पक्षाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने लढा देऊ’, असे माकपने सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्टाचारी पक्षावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रनिष्ठ पक्ष आणि संघटना  यांनी केली पाहिजे !