नवी देहली – ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातील राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आकडेवारी दिली आहे. यात भाजपला सर्वाधिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे. भाजपला मिळालेली देणगी काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप), नॅशनल पीपल्स पार्टी (एन्पीईपी) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना मिळालेल्या एकूण देणग्यांपेक्षा ६ पट अधिक आहेत. या अहवालात एकूण २ सहस्र ५४४ कोटी २८ लाख रुपयांच्या देणग्यांची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
१. ‘कॉर्पोरेट’ किंवा व्यावसायिक क्षेत्राने एकूण ३ सहस्र ७५५ देणग्या दिल्या, ज्याची एकूण रक्कम २ सहस्र २६२ कोटी ५ह लाख इतकी आहे. हे प्रमाण एकूण देणग्यांच्या ८८.९ टक्के आहे.
२. भाजपला एकूण २ सहस्र ६४ कोटी ५८ लाख रुपये मिळाले. याखेरीज ४ सहस्र ६२८ लोकांनी भाजपला १६९ कोटी १२ लाख रुपयांचे दान दिले.
३. काँग्रेसला कॉर्पोरेट क्षेत्राकडून १९० कोटी ३० लाख रुपयांच्या, तर सामान्य लोकांकडून ९० कोटी ८९ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार