Hamas Leaders Cutouts In Kerala : पलक्कड (केरळ) येथील मुसलमानांनी उरुसाच्या वेळी हमासच्या नेत्यांचे फलक झळकावले !

(उरुस म्हणजे एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव)

उरुसाच्या वेळी झळकावलेले हमासच्या नेत्यांचे फलक

पलक्कड (केरळ) – येथे १६ फेब्रुवारी या दिवशी मुसलमान धर्मगुरु त्रिथला यांच्या थडग्याच्या ठिकाणी उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहस्रो लोक सहभागी झाले होते. त्यानंतर हत्तींवर बसलेल्या मुसलमानांनी हमासचे ठार झालेले प्रमुख नेते इस्माईल हनिया, याह्या सिनवार आणि हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह यांची छायाचित्रे असलेले फलक हातात धरले होते. या घटनेच्या वेळी केरळ सरकारचे एक मंत्री आणि काँग्रेसचा एक माजी आमदार उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर भाजपकडून टीका करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. (पोलिसांना स्वतःहून तक्रार करून कारवाई करण्याचा अधिकार असतांना त्याचा वापर करून कारवाई का केली नाही ? – संपादक)

केरळमधील माकप सरकारच्या पाठिंब्याने मतपेढीसाठी अशा घटना घडत आहेत ! – भाजपची टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् म्हणाले की, सध्याच्या माकप सरकारच्या पाठिंब्याने हे सर्व उपक्रम मतपेढीच्या राजकारणासाठी केले जात आहेत. देशविरोधी संघटना आणि कट्टरतावादी घटक येथे काम करत आहेत. केरळमध्ये केवळ भाजपच देशविरोधी आणि आतंकवादी कारवायांविरुद्ध आहे. एक वर्षापूर्वी केरळमध्ये झालेल्या एका सभेमध्ये हमासचा नेता ऑनलाईन उपस्थित राहिल्यावर भाजपने टीका केली होती. तेव्हा केरळ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. (यातून केरळ सरकारची मानसिकता लक्षात येते ! – संपादक)

(म्हणे) ‘देशातील अनेक लोक पॅलेस्टाईनचे समर्थन करतात !’ – काँग्रेसचे माजी आमदार व्ही.टी. बलराम

उरुसाच्या वेळी उपस्थित असणारे काँग्रेसचे माजी आमदार व्ही.टी. बलराम यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत म्हटले की, सर्व भारतीय, अगदी संघ परिवाराशी संबंधित नसलेले लोकही, पॅलेस्टिनी लोकांचे आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षांचे समर्थन करतात. (पॅलेस्टाईनचे समर्थन भारत सरकारनेही केले आहे; मात्र हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन केले जात असतांना काँग्रेसचे मूक समर्थन का ? – संपादक)  हमासच्या नेत्यांचा गौरव करावा कि नाही, हे वेगळे सूत्र आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटनेचे नेते केरळमधील मुसलमानांचे कोण लागतात ?  अशा मुसलमानांना पकडून त्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र केरळमध्ये जिहाद्यांचे समर्थक असणार्‍या कम्युनिस्टांचे सरकार असल्याने असे होणे शक्य नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !