Mahakumbh 2025 : हिंदु जनजागृती समितीने घेतली मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट

मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज (बसलेले) यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देतांना उजवीकडून समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.