विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !

प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री सेक्टर ७ येथे लागलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षात अनेक संत-महंत येऊन आशीर्वाद देत आहेत, तसेच विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गारही काढत आहेत. खालसा आखाड्याचे हिम्मत सिंह महाराज, तसेच ब्रज येथील योगेंद्र महाराज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर नतमस्तक झाले.

येथे परमात्म्याचा वास आहे ! – हिम्मत सिंह महाराज, खालसा आखाडा

‘प्रदर्शन पाहून पुष्कळ आनंद मिळाला. मला असे वाटले की, या कक्षामध्ये परमात्मा आहे. बाहेर गेल्यावर तो जाणवत नाही. येथे मात्र जाणवतो. तुम्ही सर्वजण जीवनाचा उद्धार करत आहात. या सेवेतूनच तुम्हाला ‘भगवंत आहे’, याची जाणीव झाली आहे. त्या परमात्म्याच्या चरणी सतत नमन करायला हवे. त्यामुळेच विश्वोद्धार होईल’, असे आशीर्वचनपर बोल खालसा आखाड्याचे हिम्मत सिंह महाराज यांनी केले.