
१. एका संतांची सेवा करतांना निर्विचार स्थिती अनुभवता येणे

एका संतांची सेवा करतांना, त्यांना अंघोळ घालतांना, म्हणजे सर्व संतांना अंघोळ घालतांना किंवा त्यांची काहीही कृती करतांना जो चैतन्याचा स्रोत आपल्याकडे येतो, त्या वेळी मनात कोणतेही विचार नसतात. ‘मला केवळ झोकून देऊन सेवा करायची आहे’, असाच विचार असतो. ‘प्रत्यक्ष हनुमंताला अभिषेक करतो आहे’, असेही वाटते. त्यांची सेवा करतांना माझा हनुमंताचा जप आपोआप चालू होतो. (ते संत हनुमानभक्त आहेत) ‘त्यांच्या खोलीमध्ये चैतन्य एवढे आहे की, ‘तेथून बाहेर पडूच नये’, असे मला वाटते. मी काही वेळा त्यांच्या समवेतच आवडीने महाप्रसाद ग्रहण करतो.
२. ‘प्रत्येक गोष्ट करतांना ती संतांसाठी करत नसून स्वतःसाठी करत आहे’, असे जाणवणे
त्या संतांना जेवण वाढतांना ‘मला भूक लागली आहे’, असे मला वाटते. तसेच त्यांना पाणी आणि औषध देतांना ‘मी माझ्यासाठी देत आहे’, असे मला वाटते. कधी कधी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे तेथे अस्तित्व जाणवते आणि थंडावा जाणवतो.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले त्या संतांना भेटायला येणार असतांना त्याची पूर्वकल्पना मिळणे
मी बाहेर असलो आणि परात्पर गुरु डॉक्टर तेथून गेले, तर मला सर्व अनुभवायला मिळते. परात्पर गुरु डॉक्टर त्या संतांना भेटायला येणार असतील, तेव्हा मला तेही आधीच कळते. त्यामुळे तेथील स्वच्छता मनापासून होते आणि प्रत्येक वेळी मी असाच भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
४. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरुदेवांची, म्हणजे प.पू. भक्तराज महाराजांची केलेली सेवा आठवून संत किंवा रुग्णाईत साधकांची सेवा करतांना तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न होणे
प.पू. डॉक्टरच सेवा करून घेतात. प.पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराजांची सेवा कशा प्रकारे केली ?, हे मला आठवते. त्या पद्धतीने मी मनात भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तसेच आरंभी रुग्णाईत साधकांच्या संदर्भात सेवा करतांना कसे करायचे आणि काय करायचे ? असे वाटते; पण त्यांच्यामध्येही संत पाहिल्यावर सेवा होते.
देवाने मला संतांना अंघोळ घालतांना आणि एका अपघात झालेल्या साधकाला अंघोळ घालतांना दोन्ही सेवेतील भेद दाखवला. ‘साधकाला अंघोळ घालणे आणि कपडे घालणे ही सेवा करतांना संतांंची सेवा करत आहे’, असा भाव ठेवायला हवा हे मला शिकायला मिळाले.
– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०२३)
प.पू. डॉक्टरांनी ‘संतसेवेचा सूक्ष्मातून लाभ होतच असतो’, असे सांगणेएकदा एका साधकाने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘मला संतसेवा मिळते; पण मी त्याचा लाभ करून घेत नाही. त्याविषयी मनात एकसारखी खंत वाटते’, असे सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘लाभ, तर होतच असतो. शिकण्याच्या दृष्टीने आपण काही बोललो नाही, तरी संतांकडून चैतन्य प्रक्षेपित होत असते, ते आपल्याला मिळते ना ! म्हणजे लाभ चालूच असतो. सूक्ष्मातून लाभ होतो.’’ – एक साधक |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |