US Plane Accident : अमेरिकेत प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक

अमेरिकेचे एक प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक होऊन दोन्ही ‘पोटोमॅक नदी’त कोसळले. यात १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकूण ६४ जण विमानात होते, तर हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते.

रत्नागिरीत ७६ व्या प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरसमवेत झाला आहे.

Republic Day 2025 : देशभरात ७६ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा !

देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आल्यानंतर तिन्ही सैन्यदलांचे संचलन, तसेच विविध राज्ये, सरकारी खाती, तसेच विविध संस्थांकडून चित्ररथ आणि नृत्य सादरीकरण करण्यात आले.

Akshay Kumar On History Books : आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौर्याचाही समावेश असायला हवा ! – अभिनेते अक्षय कुमार

अक्षय कुमार म्हणाले की, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बर्‍याच गोष्टी सुधाराव्या लागतील. अकबर आणि औरंगजेब यांच्याबद्दल वाचायला मिळते; पण आपल्या स्वतःच्या नायकांबद्दल नाही.

पाकिस्तान आणि तालिबान संघर्षाची रणभूमी ‘वाखान कॉरिडॉर’ !

वाखान कॉरिडॉर हा ब्रिटीश काळात वर्ष १८९३ च्या ‘ड्युरंड रेषा करारा’चा एक भाग आहे, हे रशिया आणि ब्रिटीश साम्राज्यामधील ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) म्हणून निर्माण करण्यात आले होते.

Bhandara – Maharashtra Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट !

२४ जानेवारीला सकाळी हा स्फोट झाला. त्यामुळे आस्थापनाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, १० किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसले. या आस्थापनात दारूगोळा निर्मितीचे कार्य होत होते.

पाकिस्तानी सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून संपवलेले इम्रान खान !

इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजकीय जीवनातून बहुतांश काढण्यात आले आहे. हा पाकिस्तानी लोकशाहीचा एक मोठा पराभव आहे. सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून त्यांना कायमचे संपवले !

Chhattisgarh Naxalists Encounter : छत्तीसगड येथील चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवादी ठार

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर १९ जानेवारीच्या रात्रीपासून चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलाला यश मिळाले आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही.