
रामेश्वरम् (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने समुद्रात मासेमारी करणार्या ११ भारतीय मासेमारांना अटक केली आहे. रामेश्वरम् मासेमार संघटनेच्या मते, अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. सरकारला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौर्यावर जाणार असतांना ही घटना घडली आहे. यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना अनेकदा भेटून या सूत्रावर उपाय काढण्याचे सांगितले आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने गेल्या वर्षी ५५० हून अधिक भारतीय मासेमारांना अटक केली होती, तर यावर्षी आतापर्यंत १५० हून अधिक मासेमारांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाभारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ? |