समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांचे गायींच्या विषयी संतापजनक विधान

कन्नौज (उत्तरप्रदेश) – आम्ही कन्नौजमध्ये बंधुत्वाचा सुगंध पसरवला आहे. दुसरीकडे भाजप द्वेषाची दुर्गंधी पसरवत आहे. भाजपच्या लोकांना दुर्गंधी आवडते, म्हणून ते गोशाळा बांधत आहेत. आम्हाला सुगंध खूप आवडला म्हणून आम्ही ‘परफ्यूम पार्क’ (अत्तरांचे संग्रहालय) निर्माण केला. मी कन्नौजच्या लोकांना भाजपने पसरवलेली ही दुर्गंधी दूर करण्याचे आवाहन करतो. काही प्रमाणात ही दुर्गंधी आधीच नष्ट झाली आहे; पण पुढील निवडणुकीत ते पूर्णपणे काढून टाका जेणेकरून कन्नौजचा रखडलेला विकास पुढे जाऊ शकेल, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांनी येथे केले.
भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी अखिलेश यादव यांच्या विधानावर टीका केली आहे. ते म्हणाले की, जर भारतात रहाणार्या एखाद्याला गायीचा दुर्गंध येत असेल, तर त्याने अशी भूमी शोधावी जिथे सनातनचा अपमान करता येईल. हे सर्व पक्ष सनातनविरुद्ध बोलत रहातात आणि सनातनविरुद्ध कामही करतात. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार राजेंद्र कुमार सिंह यांनी म्हटले होते की, ‘भाजपने साधू, संत आणि मंडलेश्वर यांच्या रूपात बैल सोडले आहेत जेणेकरून हे बैल इतर धर्मांच्या शेतात प्रवेश करून चरू शकतील.’ एकीकडे अखिलेश यादव यांना गायींमध्ये दुर्गंधी दिसते, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पक्षाचे नेते संत आणि ऋषी यांच्यामध्ये बैल पहातात.
संपादकीय भूमिका
|