PM Kisan Samman Nidhi Scam : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा अपलाभ; १८१ बांगलादेशींविरुद्ध गुन्हा नोंद !

नाशिक येथील घटना !

भाजपचे नेते किरीट सोमय्या

नाशिक – जिल्ह्यातील १८१ बांगलादेशींनी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा अपलाभ घेतल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणली होती. या बांगलादेशींविरोधात २६ मार्च या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या बांगलादेशींनी ते भादवण गावचे रहिवासी असल्याचे दाखवत अपलाभ घेतला होता. आरोपींमध्ये सुक्तारा खातुन, नजमुल हक, तस्लिमा खातुन, इंताब, महंमद हजरत, महंमद रशिद आलम, अनिसा, अन्वरा, साहुद राजा, सलाम अली, अफीफा खातुन, इशरत जहाँ, जुलेखा बीबी, अख्तर हुसेन, महंमद हनिफ, खुशबू, महंमद मंजरुल आलम, ताहेर आलम, सरीना खातुन यांच्यासह अनेक जणांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे सरकारच्या योजनांचा अपलाभ घेणार्‍या घुसखोरांवर कठोर कारवाई करत त्यांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे !