संपूर्ण भारत देश हिंदु राष्ट्र बनेल ! – पू. कृष्णात डोणे महाराज

पू. कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक

श्रीक्षेत्र आदमापूर (जिल्हा कोल्हापूर) – भारत देश संपूर्ण हिंदु राष्ट्र बनेल, हिंदु धर्माची संस्कृती अन्य देश आत्मसात करतील, हिंदु धर्माची पताका जगात मिरवेल, देशात समान नागरी कायदा येईल, तसेच राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, यांसह अन्य भाकिते श्रीक्षेत्र आदमापूर (तालुका भुदरगड) येथे वर्तवण्यात आली. सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागराच्या दिवशी संत बाळूमामा मंदिरासमोर मुख्य भाकणूदार पू. कृष्णात डोणे महाराज यांनी ही भाकिते वर्तवली. सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत हा भंडारा उत्सव होत आहे.

पू. कृष्णात डोणे महाराज यांनी वर्तवलेली अन्य भाकिते

१. नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळी भागांत नंदनवन होईल

२. मोठी महामारी येईल

३. उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी-जलाशय सगळे आटून जातील, जलाशयाला भगदाड पडेल

४. वादळ-भूकंप याने जगाची उलथापालथ होईल

५. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल