Chhattisgarh Naxalists Encounter : छत्तीसगड येथील चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवादी ठार

प्रतिकात्मक छायाचित्र

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड-ओडिशा सीमेवर १९ जानेवारीच्या रात्रीपासून चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलाला यश मिळाले आहे. त्यामध्ये प्रत्येकी १ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस असलेले २ नक्षलवादी आहेत. छत्तीसगड आणि ओडिशा पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १ सहस्र सैनिक यात सहभागी आहेत. ३०० हून अधिक सैनिक थेट कारवाईमध्ये आहेत. उर्वरित त्यांना साहाय्य करत आहेत.