Delhi MLA Demand On Namaz : सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यावर बंदी घालावी !

देहलीतील भाजपच्या आमदारांची पोलिसांकडे मागणी

भाजपचे आमदार करनैल सिंह

नवी देहली – रस्त्यांवर नमाजपठण केल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे, ज्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे आणि कधीकधी रुग्णवाहिका, स्कूल बस आणि इतर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होतो. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे; परंतु त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि वाहतूक प्रभावित होऊ देऊ नये, असे सांगत सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याची मागणी देहलीतील शकूर बस्ती मतदार संघाचे भाजपचे आमदार करनैल सिंह यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात देहलीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पोलिसांना धार्मिक कार्यक्रम केवळ मशिदी आणि खासगी परिसरांपुरते मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले.

संपादकीय भूमिका

मुळात अशी मागणी करावीच लागू नये. सार्वजनिक ठिकाणी जनतेची गैरसोय करून नमाजपठण करणे हा गुन्हाच झाला पाहिजे. तसे पोलीस करत नसतील, तर पोलिसांवरच कारवाई झाली पाहिजे !