Bhandara – Maharashtra Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट !

७ जण घायाळ, तर ८ जणांचा मृत्यू !

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण आस्थापनात स्फोट

भंडारा : जिल्ह्यातील आयुध निर्माण आस्थापनात स्फोट झाला असून त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. यामध्ये ७ जण घायाळ झालेले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घायाळांवर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. २४ जानेवारीला सकाळी १०.४५ वाजता हा स्फोट झाला. त्यामुळे आस्थापनाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, १० किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसले. या आस्थापनात दारूगोळा निर्मितीचे कार्य होत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,

‘‘जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारचे साहाय्य पुरवत आहेत. बचाव कार्यासाठी एस्.डी.आर्.एफ्., तसेच नागपूर महापालिकेचा चमू यांनाही बोलावण्यात आले आहे. यात ठार झालेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. घायाळ झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’’