US Plane Accident : अमेरिकेत प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक

आतापर्यंत १८ जण ठार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथे २९ जानेवारीला अमेरिकेचे एक प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर यांची धडक होऊन दोन्ही ‘पोटोमॅक नदी’त कोसळले. यात १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकूण ६४ जण विमानात होते, तर हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते. आतापर्यंत ४ जणांना नदीतून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.