प्रयागराज / नवी देहली – भारताचा ७६ वा प्रजासत्ताकदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आल्यानंतर तिन्ही सैन्यदलांचे संचलन, तसेच विविध राज्ये, सरकारी खाती, तसेच विविध संस्थांकडून चित्ररथ आणि नृत्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह देशातील विविध राज्यांतही प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.