Akshay Kumar On History Books : आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौर्याचाही समावेश असायला हवा ! – अभिनेते अक्षय कुमार

अभिनेते अक्षय कुमार

मुंबई – इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश असावा; कारण आपल्याला अनेकदा अकबर आणि औरंगजेब यांसारख्या लोकांबद्दल वाचायला मिळते; परंतु आपले खरे नायक, ज्यांच्या शौर्याने देश वाचला, ते भारतीय सैन्याचे सैनिक ! त्यांच्या कथा अजूनही अप्रकाशित आहेत, असे विधान हिंदी चित्रपट अभिनेते अक्षय कुमार यांनी एका मुलाखतीत केले.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुधारणा आवश्यक

अक्षय कुमार म्हणाले की, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बर्‍याच गोष्टी सुधाराव्या लागतील. अकबर आणि औरंगजेब यांच्याबद्दल वाचायला मिळते; पण आपल्या स्वतःच्या नायकांबद्दल नाही. त्यांची नावे देखील पुस्तकांमध्ये असली पाहिजेत. आपल्याकडे सैन्याशी संबंधित अनेक कथा आहेत. अनेक सैनिकांना परमवीर चक्र मिळाले आहे. मला वाटते की, अशा वीर सैनिकांच्या कथा नवीन पिढीला सांगितल्या पाहिजेत.

अक्षय कुमार म्हणाले की, मी माझ्या चित्रपटांमध्ये जाणूनबुजून अशी पात्रे निवडली आहेत, जी आमच्या पुस्तकांचा भाग नाहीत. लोकांना या नायकांबद्दल माहिती नाही; कारण कुणीही त्यांच्या कथांचा सखोल अभ्यास करत नाही.