Delhi Illegal Meat Ban : देहलीत बेकायदेशीररित्या मांस आणि मासे विक्रीवर बंदी !  

देहलीतील भाजप सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा

नवी देहली – देहली राज्यात बेकायदेशीरपणे मांस आणि मासे विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. देहलीतील भाजप सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी सांगितले की, बेकायदेशीर मांस आणि मासे विकणारी दुकाने बंद करण्याचे निर्देश राजधानीतील अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीरपणे मांस आणि मासे विकू नये.

देहली विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी भाजपचे आमदार करनैल सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला की, धार्मिक स्थळांभोवती चालणार्‍या मांस आणि मासे यांच्या  दुकानांवर कधी अन् काय कारवाई केली जाणार आहे ? या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री प्रवेश वर्मा यांनी वरील उत्तर दिले.

संपादकीय भूमिका

देहली सरकारने केवळ बंदी घालून थांबू नये, तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यांच्यात धाक निर्माण होईल !