महाराष्ट्र विधीमंडळाचे ३० जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन

मुंबई – बहुचर्चित अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च या दिवशी संपले. ३० जूनपासून मुंबईतील विधान भवनात पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिदिन सरासरी ९ घंटे ७ मिनिटे कामकाज !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत १६ दिवस प्रत्यक्ष कामकाज झाले. विविध कारणांमुळे १ घंटा २५ मिनिटे वेळ वाया गेला. मंत्री उपस्थित नसल्याने २० मिनिटे वाया गेली. प्रतिदिन सरासरी कामकाज ९ घंटे ७ मिनिटे इतके झाले. ४९१ प्रश्न स्वीकृत झाले. त्यांतील ७६ प्रश्नांवर मंत्र्यांनी उत्तरे दिली. २ सहस्र ५५७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यांतील ४४२ स्वीकारण्यात आल्या. त्यांपैकी १२९ वर चर्चा झाली. विधानसभेत ९, तर विधान परिषदेत ३ शासकीय विधेयके संमत झाली. ४२ अशासकीय विधेयके प्राप्त झाली, त्यांपैकी २२ विचारात घेण्यात आली, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.