Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड येथील चकमकीत १५ नक्षलवादी ठार

१ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादीही ठार

गरियाबंद (छत्तीसगड) – कुर्‍हाडी घाटातील भालू दिग्गी जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी १५ नक्षलवाद्यांना ठार मारले. यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम उपाख्य चलपती हाही मारला गेला आहे. तसेच एक महिला नक्षलवादीही ठार झाली. १९ जानेवारीच्या रात्रीपासून येथे अधूनमधून गोळीबार चालू होता. १ सहस्र सैनिकांनी अनुमाने ६० नक्षलवाद्यांना घेरले होते. या चकमकीत १ सैनिक घायाळ झाला.